कालकुंद्री येथे पानंद रस्ता काम शुभारंभ प्रसंगी तहसीलदार विनोद रणवरे, सोबत कालकुंद्री गावचे भूषण कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, उपजिल्हाधिकारी संजय पाटील व मान्यवर. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवारात जाणारे पानंद रस्ते अतिक्रमणमुक्त होऊन ते बारमाही वाहतुकीस खुले झाल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल! असा विश्वास कोकण विभागीय आयुक्त विलास बाळाराम पाटील यांनी व्यक्त केला. ते कालकुंद्री (ता. चंदगड) येथे गाव विकास आराखडा कामांतर्गत पाणंद रस्ता काम शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच छाया जोशी होत्या.
स्वागत उपसरपंच संभाजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक ग्रामसेवक दत्ता नाईक यांनी केले. कालकुंद्री गावचे सुपुत्र असलेले विलास पाटील पुढे म्हणाले, ``गावाचा विकास आराखडा तयार असून यात गाव शिवारातील पानंद रस्त्यांसह सांस्कृतिक भवन, आधुनिक व्यायामशाळा, सुसज्ज वाचनालय आदी मूलभूत सुविधांसाठी आपण प्रयत्नशील आहोत. तथापि विकासाचा गाडा ग्रामस्थांच्या सहकार्याशिवाय तडीस जाणार नाही. असेही त्यांनी आवर्जून सांगितले.`` यावेळी विलास पाटील व त्यांचे बंधू पुणे चे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्या हस्ते दुंडगे पानंद रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे, उपनिरीक्षक सतपाल कांबळे, मंडल अधिकारी शरद मगदूम, राजश्री पचंडी, सामाजिक कार्यकर्ते एम. जे. पाटील, अशोक रामू पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शंकर कोले, पोलीस पाटील संगीता कोळी, भरमू पाटील, विलास शेटजी, शंकर मुर्डेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाजी कोकितकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment