कागणी : सी. एल. वृत्तसेवा
म्हाळेवाडी (ता. चंदगड) चे लोकनियुक्त सरपंच व हलकर्णी येथील महाविद्यालयाचे कर्मचारी सी. ए. पाटील उर्फ चाळोबा पाटील हे महाशिवरात्रीनिमित्त म्हाळेवाडी येथे देवदर्शन घेऊन मंगळवारी दी. १ रोजी सायंकाळी ५ वाजता हलकर्णी कडे जात असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या सहा मद्य प्राशन केलेल्या तरुणांनी म्हाळेवाडी ते शिवनगे दरम्यान अडवून त्यांना जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला, हाताला मार लागला आहे. त्यांच्यावर बेळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार राजेश पाटील यांचे ते खंदे समर्थक असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन चौकशी केली आहे. आमदार राजेश पाटील यांनी तपासाबाबत चंदगड पोलिसांना सूचना केली आहे तर जिल्हा पोलीसप्रमुख यांच्याकडे हल्लेखोरांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सदर तरुण मद्यप्राशन केले होते. तसेच लोखंडी रॉडनेही मारहाण केली आहे. यानंतर पोलिसांकडून माणगाव तसेच कोवाड येथील सीसीटीव्ही फुटेजद्वारे अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
No comments:
Post a Comment