तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील ओमकार प्रकाश बागीलगेकर याला नॅशनल कॅडेट कोर(NCC) चे ले. जनरल एस. एस. थोरात अवॉर्ड शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कडून जाहिर करण्यात आले.
ओमकार हा राजाराम महाविद्यालयामध्ये बीएस्सी भाग ३ मध्ये शिकत आहे. एनसीसीमध्ये केलेल्या उत्तम कार्याबद्दल ओमकारला हा पुरस्कार जाहिर करण्यात आला. हा पुरस्कार मिळवल्याबद्दल ओमकारचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment