चंदगड एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना 'ऑपरेशन मदत' चा आधार, दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याना मिळाली मदत - चंदगड लाईव्ह न्युज

05 March 2022

चंदगड एसटी संपकरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना 'ऑपरेशन मदत' चा आधार, दि न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याना मिळाली मदत

'ऑपरेशन मदत' मार्फत एसटी कर्मचाऱ्यांना मदत देताना.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    महाराष्ट्रातील एसटी कामगार न्याय हक्कासाठी (सरकारी नियमानुसार नोकरीत सामावून घेण्यासाठी) संपावर गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील काही एसटी कामगारही त्यात सहभागी झाले आहेत. गेल्या 4 महिन्यांपासून त्यांचा पगार थांबला आहे. त्यामुळे येथील सहभागी संपकरी कुटुंबांची अवस्था दयनीय झाली असून मुलांच्या शाळेचा खर्च, रुग्णालयाचा खर्च व दैनंदिन कौटुंबिक खर्च भागवणे कठीण झाले आहे. 

 चंदगड एसटी डेपोतील बहुतांश कर्मचारी विदर्भाजवळील मध्य महाराष्ट्र (लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बीड आणि परळी) आहेत. पर जिल्ह्यातील असल्याने आजुबाजूंच्या कडून आणि नोकरीसाठी लांबवर रहात असल्यामुळे नातेवाईकांकडून त्यांना मदत मिळत नाही, यात महिलांची फारच कुचंबणा होते. कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांवर चालक म्हणून काम करावे लागत असून कुटुंबातील महिलांना मजुरीसाठी कामावर जावे लागते. या ओढातानीत मुलांवर फार मोठा आघात होत आहे, हे ओळखून 'ऑपरेशन मदत' च्या माध्यमातून काही दानशूर व्यक्तींनी जुजबी मदत (तांदूळ, गहू, तेल, साबण, टुथपेस्ट, मच्छर अगरबत्ती) दिली आहे, ती आज 'ऑपरेशन मदत' व फेसबुक फ्रेंडस् सर्कल च्या सदस्यांनी गरजू विद्यार्थ्यी व कुटुंबातील सदस्यांना पोहोचविली आहे.

 दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथे या कर्मचाऱ्यांची काही मुले शिक्षण घेत आहेत . श्रृती दराडे, वैष्णवी तोरस्कर, दिपक गावडे, समीक्षा मासरणकर , स्नेहा जाधव, नताशा घोडाम अनिकेत हकदणकर या विघार्थांशी संवाद साधून दि न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक संजय साबळे यांनी या मुलांच्या घरची परिस्थिती समजून घेतली. व बेळगाव येथील ऑपरेशन मदत या ग्रुप मार्फत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न कले.

 ही छोटीशी मदत दि न्यू इंग्लिश स्कूलचे  तानाजी चांदेकर, संजय साबळे,पुष्पा सुतार, दिपक पाटील, शरद हदगल या मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आली. याप्रसंगी प्रकाश तोरस्कर, दिपक गावडे, गोविंद मासरणकर, ज्ञानेश्वर जाधव, विलास घोडाम, गोविंद दराडे चंदगडमधील प्रतिष्ठित नागरिक, कुटुंबीय आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावर मोजक्या संपकऱ्यानी आपले मत व्यक्त केले.

याप्रसंगी ऑपरेशन मदतचे अॅड.राहूल पाटील, संतोष दरेकर उपस्थित होते.



1 comment:

Unknown said...

पगार वाढ दिली काही कर्मचारी कामावर हजर झाले ह्यांच्यामुळे लोकांचे किती हाल होत हे तुम्हला दिसत नाही मजेत आहेत हे लोक त्यांचे हाल झाले असते तर कामावर जाऊन आपल्या कटुबचा खर्च चालवला असता

Post a Comment