दाटे येथे आरोग्य तपासणीवेळी उपस्थित मान्यवर, शेजारी सभापती अनंत कांबळे, पांडूरंग पाटील आदि. |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
दाना केअर फाऊंडेशन व श्री अँर्थो अँन्ड ट्रॉमा सेंटर आणि सिध्दार्थ नेत्रालय बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने दाटे (ता. चंदगड) येथे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागात नित्याची कामे करणारा आबालवृध्द, महिलावर्ग, लहान मुले यांच्या आरोग्य विषयक अनेक तक्रारी असतात. आयुष्याच्या वाटचालीत गुंतत गेलेली ग्रामीण भागातील माणसं स्वतःच्या आरोग्याच्या उध्दभवलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. सुरवातीला आरोग्याच्या बाबतीत साधे साधे वाटणारे हे प्रश्न कधीकधी इतके गंभीर होतात की, शेतात काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या कित्येकांसाठी ते त्रासदायक बनतात.
अशा कोणत्याच संकटांचा कंपनी परिसरातील गावखेड्यांना सामना करावा लागू नये म्हणून या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिबीरार्थीच्या आरोग्य विषयक विविध तपासणी व चाचण्या करण्यात आल्या असून आवश्यकता ओळखून औषधोपचार सुध्दा करण्यात आले आहेत. ग्रामीण खेड्यात कोरोना सारखी महामारी,रक्तदाब,शुगर्स,संधीवात असे अनेक आजार दिवसेंदिवस फोफावत आहेत.त्याला कुठेतरी आळा घालत समाजजागृती करावी हा उद्देश या आरोग्य तपासणी शिबीराचा आहे.
दाना केअर फाऊंडेशन मार्फत चंदगड तालुक्यात कंपनीच्या CSR फंडातून अनेक लहान मोठे प्रकल्प चालू आहेत.त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्य विषयक अनेक बाबींचा समावेश आहे. आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक दुर्गम खेड्यातमध्ये आरोग्य विषय कार्याला हातभार लावण्याचे कंपनीचे प्रयत्न आहेत.
दाटे इथे संपन्न झालेल्या शिबीरात साधारण ३०० ते ३५० शिबिरार्थींनी सहभाग घेऊन लाभ घेतल्याची माहिती दाना कंपनीचे CSR अधिकारी पांडूरंग पाटील यांनी दिली. यावेळी कंपनी कर्मचारी विष्णू कांबळे यांच्या प्रयत्नातून हे आरोग्य शिबीर अगदी यशस्वीरीत्या पार पडले. या ठिकाणी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुर्यकांत माने, संतोष नेसरकर, प्रमोद हेंब्रम यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती अंनत कांबळे उपस्थित होते. तसेच या शिबिरासाठी दाटे सह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment