कोविड लसिकरण पात्र असलेल्या विद्यार्थी व नागरिकांनी लसीकरण करून द्यावे - तालूका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2022

कोविड लसिकरण पात्र असलेल्या विद्यार्थी व नागरिकांनी लसीकरण करून द्यावे - तालूका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ


अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

          सध्या चीन व अनेक युरोपियन देशात कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र व देशात कोरोनाविषयी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शासनाने जारी केलेल्या वयोगटानुसार पात्र विद्यार्थी व नागरिकांनी कोरोना लसिकरण करून घेण्याचे आवाहन चंदगड तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी केले आहे.

         सध्या  12-14 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी   चंदगड तालुक्यामध्ये सर्वच आरोग्य केंद्रामार्फत शाळेमध्येच लसीकरण चालू केलेले आहे. सदरील वयोगटातील मुलांना corbevax ही लस देण्यात येत आहे. सदरील लसीचा दुसरा डोस 28 दिवसानंतर देण्यात येणार आहे. जी मुले 2008, 2009 व 15 मार्च 2010 पूर्वी जन्मलेली आहेत अशी मुले सदरील लसीसाठी पात्र आहेत. तसेच वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या सर्वच नागरीकांना कोरोना लसीचा तिसरा डोस ( बुस्टर डोस) देण्यात येत  आहे. ज्या नागरिकांना दुसरा डोस घेवून 9 महिणे पूर्ण झालेले आहेत. अशा सर्व 60 वर्षावरील नागरीकांनी बुस्टर डोस घेणे अत्यंत गरजेचे आहे. गरोदर स्त्रीया व 15-18 वर्षे वयोगटातील मुले ज्यांचे अजून पहिला किंवा दुसरा डोस घेणे बाकी आहे त्यांनी लस घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी सद्यातरी लस हाच एकमेव उपाय असल्याने वयोगटाप्रमाणे देय असलेली लस सर्वांनी घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ व तालुक्यातील सर्व वैद्यकिय अधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment