हिंडगाव सेवासंस्थेत सत्ताधारी फाटक गटाची सत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

23 March 2022

हिंडगाव सेवासंस्थेत सत्ताधारी फाटक गटाची सत्ता

हिंडगाव सेवा संस्थेत सत्ताधारी गटाची सत्ता आल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       हिंडगाव (ता. चंदगड) येथील ग्रुप सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार राजेश पाटील यांना माणणाऱ्या कै. तुकाराम धोंडिबा फाटक गटाने अकरा पैकी सात जागा जिंकून सत्ता कायम राखली. हिंडगावसह फाटकवाडी, मांगलेवाडी, म्हाळुंगे, काजिर्णे, गवसे, इलगेवाडी कार्यक्षेत्र असलेल्या या सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार नरसिंगराव पाटील गटात दुफळी निर्माण होऊन हा गट दोन गटांत विभागला गेला. माजी आमदार कै. नरसिंगराव पााटील व माजी अध्यक्ष कै. तुकाराम धोंडिबा फाटक विकास आघाडी विरुध्द कै. नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील अशी लढत झाली. या लढतीत सत्ताधारी फाटक गटला  सात जागा मिळाल्या. सत्ताधारी गटाचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत तुकाराम फाटक, जितेंद्र मारुती परदेशी, तुकाराम दाजी फाटक, नरेंद्र सुभाष फाटक, मारुती संतु फाटक, सट्टू राणू मस्कर, नीता नारायण फाटक हे सात उमेदवार निवडून आले. कै. नरसिंगराव पाटील व गोपाळराव पाटील यांच्या परिवर्तन शेतकरी आघाडीचे अमित विश्राम चिटणीस, लक्ष्मण संतु फाटक, वसंत मल्लाप्पा वायदंडे, दिपाली देवदास पाटील हे चार उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत एकूण ६०६ सभासदांपकी ४४९ सभासदांनी मतदनाचा हक्क बजावला.

No comments:

Post a Comment