कोदाळी येथील माऊली देवीच्या यात्रौत्सवाला २५ मार्च पासून सुरवात - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2022

कोदाळी येथील माऊली देवीच्या यात्रौत्सवाला २५ मार्च पासून सुरवात

 

कोदाळी (ता. चंदगड) येथील श्री माऊली देवीचे मंदिर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यासह बेळगाव, गोवा येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोदाळी (ता. चंदगड) येथील श्री माऊली देवीची यात्रा  शुक्रवार दि.२५ मार्च २०२२ ते २७ मार्च २०२२ अखेर संपन्न होणार असल्याची माहीती कोदाळी गावच्या सरपंच सौ. सोनाली अंकुश गावडे यांनी दिली.
      दि.२५ रोजी  जागर होणार असून रात्री  ११ वा. "समशेर जंग"  हे काल्पनिक ऐतिहासिक नाटक सादर होणार आहे,शनिवार दि.२६ रोजी- सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून   ११ वाजता महाप्रसादाला सुरुवात  होणार आहे .दुपारी ३ वा . माऊली देवीचा पालकी उत्सव साजरा होणार असून रात्री११.वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तर रविवार 
 दि .२७ रोजी सकाळी नवस फेडणे, मागणी मागणे ,गाऱ्हाणे घालणे कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे . या यात्रेचा लाभ सर्व भाविक भक्तानी घ्यावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

No comments:

Post a Comment