लेखकाने माणसं वाचली पाहिजे - कवी संजय साबळे, वर्षा तावडे यांच्या अमृतधारा पुस्तकाचे आजरा येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2022

लेखकाने माणसं वाचली पाहिजे - कवी संजय साबळे, वर्षा तावडे यांच्या अमृतधारा पुस्तकाचे आजरा येथे प्रकाशन

अमृतधारा या पुस्तक प्रकाशन समयी उपस्थित मान्यवर.

आजरा / सी. एल. वृत्तसेवा

"लेखकांनी प्रथम माणूस वाचायला शिकले पाहिजे. माणूस ओळखायला शिकले पाहिजे. त्यात निरिक्षण व कल्पनाशक्ती असली तर तो चांगले लेखन करू शकतो. " असे प्रतिपादन कवी संजय साबळे यांनी अमृतधारा या पुस्तक प्रकाशन समयी केले.

   वर्षा तावडे लिखित  'अमृतधारा ' कथासंग्रह रुचित प्रकाशन पूणे यांनी प्रकाशित केला आहे.

पुस्तकाचे प्रकाशन हॉटेल मॉर्निंक स्टार, आजरा येथे मोठया दिमाखदार सोहळ्यात पार पडला.

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी समाजसेवक संदिप परब होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता खाडे यांनी केले. पुस्तक परिचय रत्नदिप पवार यांनी करून दिला.

"गावगाडयात अजूनही नातीगोती टिकून आहेत. संस्कार, प्रेम, माया टिकवण्याचे काम कुंटूंबाचे आहे.आधुनिकतेच्या नावाखाली नावाखाली नितीमूल्य हरवत चालली आहेत. त्याचे प्रतिबिंब आजच्या साहित्यात उमटणे काळाची गरज आहे " असे मत अमृतधारा कथासंग्रहाच्या लेखिका वर्षा तावडे यांनी मांडले.

यावेळी आर्या साबळे हिच्या कथाकथनाने सर्वांची मने जिंकली.

कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे,ऋषिकेश वडके राजू टोपले, अनूज केसरकर, अनुष्का गोवेकर, मारूती चव्हाण,नगराध्यक्षा  चराटी मॅडम आणि उपनगराध्यक्षा सावंत, माझी सभापती गुरव.  प्रकाशन सोहळ्यात साठी उपस्थित होते. कार्यक्रम कॉलेज कट्टा ग्रुप नी आयोजित केला होता. निलेश घाटगे, प्रकाश पंडित, सुरज, संतोष देसाई, रत्नदीप पवार, सुनील दिवेकर, संतोष डोंगरे, विवेक चव्हाण,शैलेश मुळीक, वैजयंता हरेर, सपना, पल्लवी कांबळे, हिना मुजावर , सविता कांबळे, आदि कॉलेज कट्टा ग्रुप चे स्नेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद भंडारी  यांनी केले. तर आभार हरीश देवरकर  यांनी मानले.




No comments:

Post a Comment