नेसरी ते गडहिंग्लज ही कॉलेज बस सुरू केल्या बदल वाहक व चालकांचा सत्कार करताना नेसरी शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते.
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
सध्या राज्यामध्ये एस. टी. कर्मचारी वर्गाचा संप सुरू आहे . या संपाचा फटका विद्यार्थी वर्गाला बसत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान बस बंद असल्याने होत आहे . ही बाब नेसरी शिवसेना व युवासेना शाखेच्या पदाधीकारी यांच्या लक्षात आल्यानंतर गडहिंग्लज आगार प्रमुखांची भेट घेऊन नेसरी ते गडहिंग्लज अशी पहाटे ६ .३० वाजता एसटी बस सेवा सुरू केली .
याबाबत शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्याशी तात्काळ गडहिंग्लज येथे नेसरीतील शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर लगेच विजय देवणे यानी गडहिंग्लज आगार प्रमुख श्री चव्हाण याना विनंती केली. नेसरी ते गडहिंग्लज बससेवा ही सकाळी ६:३० चालू केला तर नेसरी ते गडहिंग्लज मार्गावरील सर्व विद्यार्थ्यांना सोयीचे होईल . त्यामुळे ही बस सेवा सुरू करण्याची विनंती केली .
त्यांनंतर गडहिंग्लज शिवसेना शहर प्रमुख संतोष चिकोडे व आगार प्रमुख श्री चव्हाण यांनी दि २१ मार्च रोजी सकाळची नेसरी ते गडहिंग्लज बससेवा चालू केली .
त्याबद्दल नेसरी शिवसेना व युवासेना शाखेच्या वतीने त्या बस चे चालक पी.के. दवडते व वाहक के. एच. दोडहट्टी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नेसरी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश शिवाजी मुरकुटे यांनी स्वागत केले. माजी उपतालुका प्रमुख विलास भाई हल्याळी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र परीट,युवासेना उपतालुका प्रमुख श्री भोपळे, नेसरी उपशहर प्रमुख दिगंबर तेजम,युवासेना उपशहरप्रमुख कैफ दड्डीकर ,नेसरी गटप्रमुख विलास कोलेकर ,मोडिलिपी तज्ञ विश्वनाथ रेळेकर, किरण हिड्दुगी, विजयकुमार पाटील, शिवाजी पाटील, बबलू पाटील, संजय भालेकर, देवराज मुनीव, विवेक कांबळे, मदार बागवान, हुसेन बागवान , नेसरी भागातील विद्यार्थी , पालक वर्ग व नेसरी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते . आभार विश्वनाथ रेळेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment