पुणे येथील ज्योतिर्लिंग मित्र मंडळाचा रौप्य महोत्सव उस्ताहात / चंदगड, आजरा , गडहिंग्लजवासिय ४२१ सदस्य - चंदगड लाईव्ह न्युज

19 April 2022

पुणे येथील ज्योतिर्लिंग मित्र मंडळाचा रौप्य महोत्सव उस्ताहात / चंदगड, आजरा , गडहिंग्लजवासिय ४२१ सदस्य

पुणे : रौप्य महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करताना मोहनदास जाधव, शिवाजी देसाई, काशिनाथ रेडेकर, सुभाष सावंत आदी


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

        पुणे येथील ज्योतिर्लिंग मित्र मंडळाचा रौप्य महोत्सव रविवार दि. १७ रोजी उत्साहात पार पडला. या मित्रमंडळामध्ये चंदगड, आजरा, गडहिंग्लजवासिय ४२१ सदस्य आहेत.

          पिंपरी- चिंचवड येथे आकुर्डी रेल्वे स्टेशन प्राधिकरण जवळ केरळ भवन मध्ये सदर कार्यक्रम झाला. नातं मातीशी झेप आकाशी हे ब्रीद वाक्य घेऊन गडहिंग्लज, आजरा, चंदगड वासियांनी 1997 ला सदर मंडळाची स्थापना केली.  रविवार दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी मंडळाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व सभासदांच्या माहिती घेऊन स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाटा मोटर चे गुणवंत कामगार शिवाजी पाटील (नागरदळे) यांनी केले. मंडळ वर्षभर आणि मागील पंचवीस वर्षे कोणकोणते कार्यक्रम राबवले. याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष सावंत (मांगुरवाडी तर्फ सावतवाडी ) यांनी केली. मंडळाचा अहवाल सचिव श्रीकांत  खुळे (किणे-आजरा )  यांनी मांडला. मंडळाला कल्लाप्पा भोगण (  जिल्हा परिषद सदस्य, माणगाव-चंदगड) आणि मंगलाताई कदम (माजी महापौर, पिंपरी चिंचवड) यांनी मार्गदर्शन केले. मंडळाच्या संचालिका सुजाता पाटील यांनी नवीन सभासदांना मंडळाची माहिती दिली. 

         प्रमुख उपस्थिती म्हणून मंडळाला पीएसआय मोहनदास जाधव (सुळे- आजरा)  यांनी सभासदांच्या मुला मुलींच्या करिअरबाबत योग्य मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शिवाजी देसाई (मूळ गाव - तेऊरवाडी, चंदगड) यांनी मंडळाच्या सभासद बंधू-भगिनींना अन्न व औषध भेसळ प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन मंडळाचे संचालक शशिकांत पाटील यांनी मानले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व ज्योतिर्लिंग मित्र मंडळचे  संचालक आणि सभासद व मंडळाचे अध्यक्ष काशिनाथ रेडेकर (हिडदुगी), उपाध्यक्ष सुभाष सावंत, खजिनदार शिवाजी पाटील (हडलगे), सेक्रेटरी श्रीकांत खुळे (किणे - आजरा) यांच्यासह अन्य बंधू भगिनींचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment