![]() |
सौ. प्राची काणेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील सर्वोदय वाचनालय, तालुका ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी सौ. प्राची दयानंद काणेकर यांची निवड करणेत आली. या वेळी सर्वोदय वाचनालयाचे संचालक सौ. अनुसया अशोक दाणी (सचिव), शिवानंद हुंबरवाडी (संचालक), दिलीप महादेव चंदगडकर, सचिन निंगाप्पा नेसरीकर, सौ. नेत्रदिपा प्रमोद कांबळे, विवेक कृष्णाजी सबनीस, विशाल गोविंद कामत हे सदस्य उपस्थित होते.
![]() |
वाचनालयाच्या अध्यक्ष निवडीनंतर सौ. काणेकर यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करताना दिलीप चंदगडकर. |
सौ. प्राची काणेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार चंदगड नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते दिलीप चंदगडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथपाल समीर बाबुराव शेलार, महादेव गुडू कुंभार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment