शारदा चंदाप्पा लमाणी |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
मन्नूर येथे देवदर्शन करून तेऊरवाडीकडे येणाऱ्या दुचाकीवरील दांपत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. या प्रकरणी चंदाप्पा शंकर लमाणी (वय 39, रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ - नांगनूर तांडा, ता. रामदुर्ग, जि. बेळगाव) यांनी चंदगड पोलिसात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या अपघातात शारदा चंदाप्पा लमाणी (वय 36, सध्या रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ- नांगनूर तांडा, ता. रामदुर्ग जि. बेळगाव) या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवार दि. 30 एप्रिल 2022 रोजी दुपारी दोनच्या सुमारास बेळगाव - कोवाड रोडवर अग्रेल करवालू यांचे शेताजवळील वळणावर होसूर गावच्या हद्दीत घडली आहे.
पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रप्पा लमानी व त्याची पत्नी हे मोटरसायकलने (गाडी नं. MH04, DC 2057) वरून मन्नूर (ता. बेळगाव) येथून देव दर्शन घेवून बेळगाव रोडने कोवाडकडे येत असताना होसूर गावच्या हद्दीत समोरून भरधाव येणाऱ्या ट्रकने मोटर सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेल्या शारदा चंदाप्पा लमाणी (वय 36) या मोटरसायकलवरुन पडून जागीच ठार झाल्या. तर फिर्यादीला गंभीर दुखापत झाली असून ट्रक चालक पसार झाला आहे. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हाचा तपास पोनि घोळवे यांच्या आदेशाने पो. स. ई. कांबळे हे करत आहेत.
No comments:
Post a Comment