ढोलगरवाडी येथे मामासाहेब लाड विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2022

ढोलगरवाडी येथे मामासाहेब लाड विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

ढोलगरवाडी येथे मामासाहेब लाड विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी (ता. चंदगड) संचलित मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी व ज्युनियर कॉलेज ढोलगरवाडी येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एन. जी. यळ्ळूरकर  यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. एन. जी. चांदेकर यांनी महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेबाबत व कामगार दिनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. जी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment