केंद्र शाळा व ग्रामपंचायत कोवाड येथे महाराष्ट्र दिनी विद्यार्थी शिक्षकांचा सत्‍कार - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2022

केंद्र शाळा व ग्रामपंचायत कोवाड येथे महाराष्ट्र दिनी विद्यार्थी शिक्षकांचा सत्‍कार

कोवाड येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन संपन्न झाला. 

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

            १ मे २०२२ रोजी स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार विजेती ग्रामपंचायत कोवाड (ता. चंदगड) व केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन संपन्न झाला. केंद्रीय शाळेत मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत येथे सरपंच सौ. अनिता कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वागत ग्राम विकास अधिकारी जी एल पाटील यांनी केले. 
           या प्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटी कोवाड च्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी  वेदांत खंडोबा पाटील, अब्दुशाहिद इम्तियाज अल्लाखान, आलिया अजमल हंचनमणी, सोनम सुनिल कारेकर, दर्शन परशुराम पाटील व बीडीएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी  नंदिनी विनायक कुंभार, याज्ञी परशराम आडाव, स्वरांजली प्रकाश पाटील, लावण्या विष्णू जोशी, जोया नदीम मुल्ला. या विद्यार्थ्यांचे व या शैक्षणिक वर्षासह मागील तीन वर्षे सतत केंद्र पातळीवर सर्वोच्च संखेने प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थी आणणारे मार्गदर्शक शिक्षक उज्वला विठ्ठल नेसरकर, कविता अनंत पाटील, भावना सातेरी अतवाडकर, श्रीकांत आप्पाजी पाटील, मधुमती गुंडू गावस, गणपती काशिराम लोहार, मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांचा सरपंच सौ अनिता भोगण, उपसरपंच पुंडलिक जाधव, सदस्य रामचंद्र व्हण्याळकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इम्तियाज अल्लाखान, बापू व्हन्याळकर, पी एस भोगण, आप्पा वांद्रे, शहानुर मुल्ला, सर्व ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते. आभार मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment