चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांची ८८ जयंती रक्तदान शिबिराने साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

01 May 2022

चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांची ८८ जयंती रक्तदान शिबिराने साजरी

म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे स्वर्गीय नरसिंगराव पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्य आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार राजेश पाटील .

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त आज म्हाळेवाडी (ता. चंदग ) येथे रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली. 

       या रक्तदान शिबिरमध्ये पंचक्रोशितिल एकूण 70 तरुणांनी रक्तदान केले. तसेच स्व. नरसिंगराव पाटील यांचा  म्हाळेवाडी येथील सहकार संकूलनामध्ये अर्ध पुतळ्याचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  आमदार राजेश पाटील, म्हाळेवाडी गावचे सरपंच सी. ए. पाटील, कानडेवाडीचे एम. के. देसाई, अभिषेक शिंपी, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अभयबाबा देसाई, तानाजी गडकरी, उद्योजक बाबूराव पाटील, एस. एन . देसाई (माजी सरपंच तळेवाडी), दयानंद भादवणकर, बाळासाहेब कानडीकर, संदिप शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरुण, ग्रामस्थ मोठया संख्येने  उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment