चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
श्री रवळनाथ को - ऑप . हौसिंग फायनान्स सोसायटीच्या गृहकर्जामुळे मयत कर्जदार सभासदाच्या वारसांना दिलासा मिळाला. नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून १२ लाख आणि रवळनाथ हौसिंग फायनानस संस्थेच्या सभासद कल्याण निधीतून ६० हजार असे एकूण १२ लाख ६० हजार रुपये मिळाल्यामुळे दिवंगत कर्जदार कै. विठ्ठल गोपाळ तुपारे यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. त्याचे असे झाले , कालकुंद्री (ता . चंदगड) येथील सरस्वती विद्यालय व ज्युनि . कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल गोपाळ तुपारे (रा. मजरे कार्वे, ता. चंदगड) यांनी घराच्या बांधकामासाठी रवळनाथ को - ऑप . हौसिंग फायनान्सकडून ५ जून २०१३ रोजी १२ लाखाचे कर्ज मंजूर केले होते. त्यावेळी रवळनाथच्या व्यवस्थापनाने त्यांना अपघात विमा योजनेची पॉलिसी घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी नॅशनल इन्शुरन्सकडून १२ लाखाचा निवास वीमा योजना पॉलिसी अंतर्गत अपघात विमा उतरविला होता.
सदर कर्जाची दिनांक २६ • २०१८ रोजी परतफेड देखील केलेली आहे. त्यानंतर दि १७ ऑगस्ट २०२१ रोजी दुर्देवाने त्यांचे मजरे कार्वे येथे अपघाती निधन झाले. त्यामुळे रवळनाथाने विमा कंपनीकडे पाठपुरावा करून त्यांच्या अपघात विमा दाव्याचा परतावा मंजुर करुन घेतला. तसेच आपल्या संस्थेतील सभासद कल्याण निधीतून ६० हजाराची मदतही दिली. चंदगड येथील शाखा कार्यालयात दिवंगत सभासद प्राचार्य विठ्ठल तुपारे त्यांच्या वारसांकडे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. त्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी रवळनाथ परिवाराचे आभार मानले. यावेळी नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे सिनिअर डिव्हीजन मॅनेजर अविनाश कांबळे आणि शरद टोपले यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष चौगुले म्हणाले, दुर्देवाने कर्जदारांवर वाईट प्रसंग आला तर त्यांचे कुटुंबीयांसमोर अर्थिक पेच निर्माण होतो. कर्ज परतफेडीसह ते कुटुंब आर्थिक अडचणीतून सावरावे यासाठीच विमा पॉलिसी आणि सभासद कल्याण निधीच्या माध्यमातून कर्जदारांना संरक्षण आणि मदत देण्याचे संस्थेचे धोरण आहे. चंदगड शाखा चेअरमन सौ . पुष्पा नेसरीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सीईओ ड . क . मायदेव यांनी सूत्रसंचालन यांनी केल . उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव यांनी आभार मानले. यावेळी उपाध्यक्ष प्रा. व्ही. के. मायदेव, शाखासल्लागार गुरुनाथ काणेकर, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे सिनिअर डिव्हीजन मॅनेजर अविनाश कांबळे, असिस्टंट मॅनेजर शामराव माने, सिनिअर बँच मॅनेजर निलेश शेटे, आजरा ऑफीस इनचार्ज शरद टोपले, शाखाधिकारी दीपक शिंदे सह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment