के. जे .पाटील यांच्या 'झुंज' कथासंग्रह पुस्तकाचे उचगाव येथे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2022

के. जे .पाटील यांच्या 'झुंज' कथासंग्रह पुस्तकाचे उचगाव येथे प्रकाशन

उचगाव येथे के जे पाटील यांच्या झुंज कथासंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

                 लचका, तलप, आघात या कथासंग्रहांचे लेखक व चंदगड तालुक्यातील उदयोन्मुख साहित्यिक कल्लाप्पा जोतिबा पाटील पाटील यांच्या 'झुंज' या नव्या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच मळेकर्णी देवालय उचगाव, (ता. जि. बेळगांव) येथे प्रा. चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. अध्यक्षस्थानी चंदगड पंचायत समितीचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे होते.

     प्राथमिक शिक्षक असलेले के. जे. पाटील हे कालकुंद्री (ता. चंदगड) गावचे असून ते ग्रामीण कथालेखक म्हणून साहित्यक्षेत्रात उदयास येत आहेत. त्यांच्या पहिल्या तिने कथासंग्रहाला वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे.

               'झुंज' कथासंग्रह प्रकाशन वेळी कोवाड महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, विनोद पाटील, एस. एल. बेळगावकर, वसंत जोशिलकर, शिक्षक  बँक संचालक शिवाजी पाटील, श्रीकांत पाटील, रमेश हुद्दार, गोविंद पाटील,  मधुकर कोकितकर, वैजनाथ जे अष्टेकर, के. जे. यांचे वडील  जोतीबा लक्ष्‍मण पाटील, आई सौ. पार्वती पाटील, पत्नी सौ. माया पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

            "पुस्तकांच्या नियमित वाचनाने व्यक्तिमत्व घडते. जगातील अनेक महनीय व्यक्ती त्यांच्या अफाट वाचनामुळेच मोठ्या झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. लेखक सामाजिक घडामोडींचे चित्रण आपल्या शब्दातून करत असतो. त्याच वाचन करणे गरजेचे आहे असे विचार एम. टी. कांबळे यांनी व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्यास प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी), शिवव्याख्याते अखलाकभाई मुजावर (महागाव), अक्षता अंडरवॉटर सर्व्हिसेस बेळगावचे मालक अशोक पाटील आदींनी शुभेच्छा दिल्या.

             यावेळी कालकुंद्री कोवाड पंचक्रोशीत सह सीमा भागातील साहित्यप्रेमी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानदीप वाचनालय, अचानक तरुण मंडळ यादव गल्ली कालकुंद्रीचे सर्व सदस्य, आदर्श ग्रुप, किटवाड शाळेचे अध्यापक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन युवराज पाटील यांनी केले. टी. डी. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment