डॉ. व्ही. के. परीट |
जागतिक पशुवैद्यक दिनी ३०/०४/२०२२ रोजी माजी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठलराव कृष्णा (व्ही के) परीट यांना पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 'राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार सन २०१५-१६' जाहीर झाला आहे.
परीट यांचे मुळगाव कालकुंद्री (ता. चंदगड) असून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील ३६ वर्षांच्या पशुवैद्यकीय सेवेत एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. याची पोहोच म्हणून त्यांच्या दवाखान्याला सन २००६ मध्ये ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत 'आदर्श दवाखाना पुरस्कार' तत्कालीन पालकमंत्री यांच्या हस्ते प्राप्त झाला होता. आपल्या कार्यकाळात चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले तालुक्यात पशुधनावरील उपचारांबरोबरच त्यांचे आरोग्य, उत्पादकता वाढवणे, दुधाळ जनावरे कशी निवडावी, चारा- पाणी व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदीबाबत पशुपालकांचे निरंतर प्रबोधन केले आहे. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल पशुसंवर्धन विभागाने घेतली आहे. पुरस्काराचे वितरण शासकीय स्तरावरून समारंभपूर्वक लवकरच करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment