तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग , HA चंदगड पाटबंधारे उपविभाग यांच्याकडून घटप्रभा मध्यम प्रकल्प (ता . चंदगड )जि . कोल्हापुर प्रकल्पाचे Emerganey Gate , Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्ती व प्रकल्पावरिल इतर अनुषांगिक दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून या प्रकल्पातून दि .१६ एप्रिल ते दि. ५ मे पर्यंत पाण्याचा जास्तीचा विसर्ग नदिपात्रात करण्यात येणार आहे . त्यामुळे नदि काठावरील शेतकऱ्यांनी सावध राहण्याचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
यासंदर्भात आमदार राजेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ठरले प्रमाणे घटप्रभा मध्यम प्रकल्पाचे Emergancy Gate Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्तीचे कामासाठी प्रकल्पाचा पाणी साठा निरंक करावयाचा आहे. त्यासाठी कामाचे व उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणेचे आहे . घटप्रभा मध्यम प्रकल्प ता . चंदगड जि . कोल्हापुर प्रकल्पाचे Emergancy Gate Stop Log Gate व Service Gate यांचे अत्यावश्यक दुरुस्ती साठी प्रकल्पाचा पाणी साठा दि १०/०६/२०२२ अखेर निरंक करावयाचा आहे . त्याशिवाय सदरची दुरुस्ती करता येणार नाही . त्याकरिता घटप्रभा मध्यम प्रकल्पामधुन दि १६/०४/२०२२ पासुन विसर्ग सुरु करणेत येणार आहे . दि १६/०४/२०२२ ते दि ०५/०५/२०२२ या दरम्यान जास्तीचा विसर्ग सोडावा लागणार आहे . त्यामुळे नदीपात्रामधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे . त्याकरीता नागरिक व ऋषीपंप धारक शेतकरी यांना खबरदारी घेणेबाबतचे अवाहन जलसंपदा विभागामार्फत करणेत येत आहे . तसेच ०५/०५/२०२२ ते १०/०६/२०२२ अखेर नदीपात्रामध्ये नियमित पाणी पुरवठा राहील . तरी आपणांस व तशा प्रकारची नोटीस आपले गावामध्ये प्रसिध्द करावी व दवंडी देखिल देवुन जलसंपदा विभागास सहकार्य करण्याची विनंती विनंती उपविभागीय अधिकारी चंदगड पाटबंधारे उपविभाग चंदगड यानी केले आहे .
No comments:
Post a Comment