केंद्र शाळा कोवाड येथे फोटो पूजन करताना मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी. |
कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती कोवाड केंद्रांतर्गत विविध शाळांत उत्साहात साजरी करण्यात आली. केंद्रीय प्राथमिक शाळा कोवाड येथे केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत वैजनाथ पाटील यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी अध्यापक श्रीकांत आप्पाजी पाटील, गणपती लोहार, मधुमती गावस, उज्वला नेसरकर, कविता पाटील, भावना अतवाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामा यादव, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
केंद्रातील कामेवाडी, चिंचणे, दुंडगे, मलतवाडी, जकनहट्टी, निट्टूर, घुलेवाडी, किणी, तेऊरवाडी आदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसह केंद्रातील श्रीराम विद्यालय कोवाड, जयप्रकाश विद्यालय किणी, तेऊरवाडी माध्यमिक, आदर्श विद्यालय कामेवाडी, दुंडगे माध्यमिक, नामदेवराव दुंडगेकर हायस्कूल मलतवाडी, शारदाबाई चव्हाण हायस्कूल निटुर, नरसिंह हायस्कूल निट्टूर या ८ माध्यमिक शाळांमध्ये विविध उपक्रमांनी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
No comments:
Post a Comment