आंतरराष्ट्रीय सामाजिक अभ्यास परीक्षेत विश्वविक्रमवीर डॉ.अनुप्रिया गावडे जगात अव्वल - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2022

आंतरराष्ट्रीय सामाजिक अभ्यास परीक्षेत विश्वविक्रमवीर डॉ.अनुप्रिया गावडे जगात अव्वल

डॉ.अनुप्रिया अमितकुमार गावडे


कोल्हापूर / सी. एल. वृत्तसेवा

शांतिनिकेतन शाळेत इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विश्वविक्रमवीर ग्रँडमास्टर भारत भूषण डॉ.अनुप्रिया अमितकुमार गावडे हिने सायन्स ओलंपियाड फाउंडेशन तर्फे यावर्षी पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक अभ्यास परीक्षेत जगात पहिला क्रमांक पटकावित कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तिला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक, शिष्यवृत्ती, सर्टिफिकेट ऑफ औटस्टॅंडिंग परफॉर्मन्स प्राप्त झाले आहे. यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय सामान्य ज्ञान परीक्षेत जगात चौथा, गणित ऑलिंपियाड मध्ये जगात आठवा, आय क्यू ऑलिम्पियाडमध्ये देशात दहावा, बीडीएस परीक्षेत देशात सतरावा, इंग्रजी ओलंपियाड मध्ये महाराष्ट्र, गोवा झोनमध्ये प्रथम तसेच सायबर ओलंपियाड, सायन्स ओलंपियाड अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये तीसहून अधिक सुवर्णपदक पटकाविले आहे. तिने आतापर्यंत पाच विश्वविक्रम प्रस्थापित केले असून, ती अनेक संस्थांची ब्रॅण्ड ॲम्बेसिडर आहे. तिला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राज्यस्तरीय, प्रादेशिक स्तरावर 35 हून अधिक पुरस्कार प्राप्त झाले असून, ती नाइट कॉलेजच्या  प्रा.डॉ. अक्षता गावडे व अमितकुमार गावडे यांची कन्या आहे. तिला शाळेच्या संचालिका सौ राजश्री काकडे मॅडम, प्राचार्य जयश्री जाधव व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.No comments:

Post a Comment