कोवाड महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत कास्य पदक - चंदगड लाईव्ह न्युज

23 April 2022

कोवाड महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत कास्य पदक

 

खेळाडू वल्लभ पाटील व किशोर भरमाना गावडा

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत रग्बी 15 साईड स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ संघाने नागपूर संघाचा 75-7 अशा गुण फरकाने विजय संपादन करुन शिवाजी विद्यापीठ संघाने  तृतीय क्रमांक मिळावीला. 

 स्पर्धा मुंबई विद्यापीठाने   अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर आयोजित केल्या होत्या. या संघात कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड ( ता. चंदगड ) च्या वल्लभ रामचंद्र पाटील आणि किशोर मल्लू भरमगावडा या दोन खेळाडूंचा सहभाग होता. त्याना  क्रीडाशिक्षक  आर. टी.पाटील आणि  दिपक पाटील  (कोल्हापूर ) यांचे मार्गदर्शन लाभले. या शारीरिक संचालक प्रा.आर.टी .पाटील आणि खेळाडूंचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, सचिव एम व्ही पाटील यांनी अभिनंदन केले.
No comments:

Post a Comment