कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत केलेल्या खडतर परिश्रमाचे अनुकरण नव्या पिढीकडून झाले पाहिजे. हाल-अपेष्टा सहन करत कष्टसाध्य शेकडो पदव्या मिळवल्या हे जागतिक किर्तीमान आहे. असे प्रतिपादन महादेवराव बी एड कॉलेजचे प्राध्यापक ग गो प्रधान यांनी केले. ते
सिद्धार्थनगर डुक्करवाडी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्ता देशमुख होते.
प्रास्ताविक गुंडू कांबळे यांनी केले. समता व पंचशिल कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने आयोजित रांगोळी व वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण गोपाळ पाटील (महाराष्ट्र राज्य कर अधिकारी) सरपंच राजू शिवणगेकर, पोलीस पाटील प्रकाश पाटील, जानबा कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
यावेळी प्रधान यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र वाचण्याचे आवाहन करताना त्यांनी लीहलेल्या राज्यघटनेमुळे भारत एकसंध आहे. त्यांचे स्त्री-पुरुष समानतेबाबत चे विचार, त्यांना मोठे करण्यासाठी वडील रामजी, आई भिमाई व पत्नी रमाई यांचा त्याग विशद केला.
यावेळी दीपक कांबळे, विष्णू कांबळे, दीपक माळी, नामदेव गावडे, तानाजी कांबळे,विजय कांबळे, सुरेश कांबळे, यलाप्पा कांबळे, कुमाना कांबळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रमेश कांबळे यांनी केले. आभार सचिन देशमुख यांनी मानले.
सकाळच्या सत्रात पंचायत समिती सभापती अनंत कांबळे यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे उद्घाटन झाले.
No comments:
Post a Comment