|
बेळगाव येथील केएलई मध्ये डॉ. मृणालिनी पाटील हिला एम.बी.बी.एस पदवी प्रदान कार्यक्रम प्रसंगी माजी खास.कोरे,प्राचार्य डॉ. मंतेशशेट्टी, उपप्राचार्य डॉ पवार आदी. |
चंदगड / प्रतिनिधी
धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील मृणालिनी परशराम ऊर्फ बबन पाटील हिने वैद्यकीय क्षेत्रातील एम.बी.बी.एस ही पदवी मिळवली. के एल.ई येथे मृणालीनी हिला मान्यवरांच्या उपस्थितीत पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. मृणालिनी पाटील हिने २०१६ मध्ये नीट उत्तीर्ण होत बेळगावच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (के. एल. ई) येथे एम.बी.बी.एस कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉक्टर पदवी संपादित केली आहे. के.एल. ई च्या वतीने आयोजित केलेल्या समारंभात के.एल. ई चे अध्यक्ष माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीदान समारंभ संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एस. मंतेशशेट्टी,उप प्राचार्य डॉ. राजेश पवार यांच्यासह वडील डॉ. बबन पाटील, आई डॉ. रेखा पाटील उपस्थित होते. तिला डॉ. मनोज तोगले, डॉ. कोठीवाले, डॉ. माधव प्रभू, डॉ. बेल्लद, डॉ. गिरीश वागळे आदींचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment