शेतकरी ,कामगार, तोडणी वाहतुक यंत्रणेच्या सहकार्यामुळे दौलत-अथर्व चा हंगाम यशस्वी-मानसिंग खोराटे, हलकर्णी येथे सेवानिवृत्त कामगारांच्या वतीने केला खोराटे यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2022

शेतकरी ,कामगार, तोडणी वाहतुक यंत्रणेच्या सहकार्यामुळे दौलत-अथर्व चा हंगाम यशस्वी-मानसिंग खोराटे, हलकर्णी येथे सेवानिवृत्त कामगारांच्या वतीने केला खोराटे यांचा सत्कार


हलकर्णी ता.चंदगड येथील दौलत साईटवर श्री गणेश मंदिरात अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचा दौलत सेवानिवृत्त सत्कार संघटनेच्या वतीने सत्कार करताना गोविंद गावडे.बाजूला ॲड.मळवीकर,गोपाळ पाटील, पृथ्वी खोराटे आदी

चंदगड/प्रतिनिधी :-- (नंदकुमार ढेरे) 
बंद स्थितीत असलेला दौलत कारखाना भाडेतत्वावर  चालवितांना आलेल्या अडचणी व त्यावर केलेली उपाय योजना व तालुक्यातील शेतकरी व कामगाराचे मिळालेले सहकार्य तसेच हा कारखाना चालवित असतांना काही बदल व नवीन गुंतवणूक केलेमूळे कारखाना १२.५ % कार्यक्षेमतेने कारखाना चालविणे शक्य होवून या हंगामामध्ये इतिहासात प्रथमच कमीत कमी कालावधीत पाच लाख चाळीस हजार मे.टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करता आला तसेच गाळपास आलेल्या ऊसास एफआरपी पेक्षा जादा दर देवून प्र . मे.टनी रु २९०१ रू प्रमाणे सर्व ऊसाचे वेळेत पेमेंट केले ही गोष्ट आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिनंदनास पात्र आहे . यावर्षी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी , अधिकारी - कामगार , तोडणी वाहतुक यंत्रणा व अन्य घटक यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे प्रतिपादन अथर्व चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यानी केले. 
  हलकर्णी ता.चंदगड येथील श्री गणेश मंदिरात सेवानिवृत्त कामगारांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्त श्री .खोराटे यांचा सेवानिवृत्त कामगारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.प्रारंभी प्रास्ताविक एस आर पाटील यानी केले.दौलत कारखाना साईट श्री गणेश मंदिर येथे सत्यनारायण पुजा सौ व श्री सुरेश शंकर सुतार यांचे शुभहस्ते सपत्नीक संपन्न झाली
         श्री.खोराटे पूढे म्हणाले दौलतमध्थे उत्पादीत झालेली साखर आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत विक्री केली आहे त्यामूळे शेतकऱ्यांची ऊस बिले , कामगारांचे पगार व इतर देणी वेळेत देणे शक्य झाले आहे . अथर्व कंपनीने करारानुसार बँकेची देणीही वेळेत देवून साखर उद्योगात  कंपनीनचा नावलौकिक चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे . यावर्षीच्या गाळपामध्ये शेतकरी व शेती खाते यांचा समन्वय चांगला राहून कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस प्राधान्याने कारखान्यास आणलेला आहे . यावर्षी उच्च प्रतिचे कंपोष्ट खत निर्मिती केली या खतास कर्नाटक व केरळ राज्यातून मागणी मार्च अखेरीस साधारणता स्थानिक शेतकऱ्यांनी वीस हजार मे . टन कंपोष्ट खताची ना नफा तत्वावर विक्री करणेत आली आहे . शेतकऱ्यांनाही कंपनी व कारखान्याच्या हिताच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त करुन वेळोवेळी पाठबळ दिले आहे . कंपनीने आज कारखाना चालण्याच्या दृष्टीने आवश्यक ते मशिनरी फेरबदल करण्यास प्राधान्य दिले असून पुढील काही दिवसात कारखाना सुस्थितीत व यापेक्षाही जादा गाळपास सज्ज होईल . कंपनी करारानुसार कामगारांचे देय असणारी रक्कम टप्या - टप्याने देण्याचा विचार करत आहे याचा एक भाग म्हणून निवृत्त कर्मचाऱ्यांचा देय रक्कमेचा पहिला टप्पा रक्कम देवून पुर्ण केला आहे . यावेळीदौलतचे मार्गदर्शक संचालक  गोपाळराव पाटील यांनी बंद दौलत कारखाना सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची माहिती देवून अथर्व इंटरट्रेड प्रा . लि . या कंपनीला आम्हा सर्व दौलत कारखान्याच्या व्यवस्थापनाचे पुर्णपणे सहकार्य राहील असे सांगितले कोणत्याही प्रश्नावर संवाद साधून मार्ग निघतो असेही नमुद करुन संयम पाळावा असे सांगितले . बंद कारखाना चालु करण्यासाठी अथर्व कंपनीने यामध्ये कारखाना मशिनरीमध्ये दुरुस्ती फेरबदल करुन उत्पादन खर्च कमी करणे तसेच उत्पादन प्रक्रिया सुरळीत राहणेच्या दृष्टीने अथक पर्यत्न केले आहेत ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे.यावेळी चंदगड वकील बार असोशिएशनचे उपाध्यक्ष ॲड. संतोष मळवीकर यांनी दौलत कारखान्याच्या इतिहासाची माहिती विशद करून हा कारखाना चालु राहण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करुन दिली व या कारखाना बंद काळात जी कर्मचारी , शेतकरी व उद्योगधंद्याची झालेली परवड ही विचारापलीकडची आहे . आपण सर्वांनी यापूढे हा कारखाना चालु रहावा यासाठी प्रयत्नशिल राहून श्री . खोराटे यांना सहकार्य करुया अशी आशा व्यक्त केली . राज्य विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील यांनी या तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या दौलत कारखान्याच्या माध्यमातूनच विकास होवू शकतो हे मान्यच करावे लागेल त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील व सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे  कंपनीे  कोल्हापूर जिल्हा बँकेकडून घेतलेल्या या कारखान्याच्या काही मागील कर्मचारी देणी याबाबत निवृत्त कर्मचारी यांचेकडून संघर्षाची भूमिका घेतली होती यामध्ये आम्ही मंडळीने अथर्व व्यवस्थापन व निवृत्त कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका घेवून योग्य असा कंपनी व कर्मचारी यांना मान्य होईल असा तोडगा काढलेला होता . यामध्ये अथर्वचे अध्यक्ष खोराटे यांनी या कर्मचाऱ्यांची देणी रक्कम समान सात हप्त्या मध्ये देण्याचे मान्य करुन त्यानुसार देय पहिला हता होळी सणापूर्वी संबधीत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे . दौलत कारखाना साईट श्री गणेश मंदिर येथे सत्यनारायण पुजा सौ व श्री सुरेश शंकर सुतार यांच्या शुभहस्ते सपत्नीक संपन्न झाली.आभार एस.के. पाटील यांनी मानले.यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील , संचालक  पृथ्वीराज खोराटे , सेक्रेटरी. अनिल काटे आणि दौलतचे कार्यकारी संचालक मनोहर होसूरकर , एच .आर . मॅनेजर जी.एस.पाटील,शेती अधिकारी सदाशिव गदळे , सिव्हील इंजिनिअर दिपक शिंदे तसेच कामगार संघटनेचे गोविंद गावडे , अरुण होंगल , विठठल गावडे , दत्तात्रय पत्ताडे व दौलत सेवा निवृत्त कामगार वर्ग उपस्थित होते.
No comments:

Post a Comment