सुतकट्टीच्या 'बारी' तील बेरडांनी पाळला 'सबूद' कोवाड येथे 'सबुद' नाटकाचा पहिला प्रयोग यशस्वी - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2022

सुतकट्टीच्या 'बारी' तील बेरडांनी पाळला 'सबूद' कोवाड येथे 'सबुद' नाटकाचा पहिला प्रयोग यशस्वी

 

सबूद नाट्यातील क्षणचित्रे.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
वादळी वारे, विजांचा कडकडाट, पावसावर मात करून कोवाड (ता. चंदगड) येथे पद्मश्री रणजित देसाई यांच्या 'बारी' कादंबरीवर आधारित नाट्यसंस्कार निर्मित 'सबुद' महानाट्याचा  मोफत असलेला पहिला प्रयोग हजारो नाट्यरसिकांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला. अध्यक्षस्थानी रणजित देसाई यांच्या कन्या श्रीमती पारू मदन नाईक होत्या, रंगमंचाचे उद्घाटन गौरव नाईक यांच्या हस्ते  तर प्रतिमा पूजन कोवाड च्या सरपंच अनिता भोगण यांच्या हस्ते झाले. स्वागत नाट्यसंस्कार मंडळाचे अध्यक्ष सत्तूराम मणगुतकर, ताम्रपर्णी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा बामणे व नाट्य निर्माते शिवाजी विष्णू पाटील यांनी केले. प्रस्ताविक दिग्दर्शक जीवन कुंभार यांनी केले. यावेळी पांडुरंग जाधव, रामा व्हन्याळकर, अश्विनी पाटील यांची भाषणे झाली. यावेळी मधुमती उदय शिंदे नाटकाचे लेखक पत्रकार सन्ना मोरे, पी ए पाटील, युवराज पाटील, एस एन पाटील, श्रीकांत पाटील आदींची उपस्थिती होती. आभार सहनिर्माते संजय कृष्णा पाटील यांनी मानले.
  रणजित देसाई यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल रोजी नियोजित महानाट्यापूर्वी दुपारी वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस यामुळे सुमारे ५० हजार रुपये खर्च करून उभारण्यात आलेला रंगमंच जमीनदोस्त झाला. यात मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे नाटक होतो की नाही असा संभ्रम नाट्य रसिकांमध्ये होता. तथापि सर्व संकटांवर मात करून नाट्यसंस्कार टीमने अखेर उद्दिष्ट गाठलेच. यावरून सुतकट्टीच्या बारीतील बेरडांनी  दिलेला 'सबूद' पाळला अशी चर्चा नाटकाच्या ठिकाणी रंगली होती.
उत्कृष्ट कथानक काळीज चिरणारे दमदार व धारदार संवाद, अफलातून टाइमिंग, नाटकाला साजेशी गीते, काळजाचा ठाव घेणारे पार्श्वसंगीत यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या महानाट्यातील कलाकारांनी रसिकांची मने जिंकताना नाटकातील पात्रे अजरामर केली. या नाटकातील सर्व कलाकार हे चंदगड तालुक्यातील विविध गावचे मुंबई रहिवाशी आहेत. त्यामुळे संबंधित कलाकारांच्या गावातील नाट्यरसिकांनी लक्षणीय उपस्थिती लावली होती.
   या नाटकातील पात्रे व कलाकार पुढील प्रमाणे तेग्या- दयानंद सरवणकर, चंद्रोजी- अमोल ना. पाटील, नागी- सुप्रिया गावकर, ईनामदार- महादेव प. पाटील, पाटील- विठ्ठल पुंडलिक पाटील, मल्ला- शिवाजी वि. पाटील, कल्लू- शिवाजी द पाटील, भीमा- किरण पालांडे, भैरु- जकनू मुरकुटे, तुका- अनिकेत क जाधव, बाळू-  प्रकाश शि. पाटील, गणपा- सईश साखरे, मैना- विलक्षणा मोरे, इनामदारीन बाई-  साक्षी घाणेकर, ईश्वरा- कु. संस्कृती जीवन कुंभार, पाटलीणबाई- धनश्री मणगुतकर, तमासगीर- सुवर्णा पालांडे, मास्तर- जीवन कुंभार.
 पार्श्वसंगीत- आनंदा कुबल, पार्श्वगायक- डॉ नेहा राजपाल, संजिता मोरे, विजय बोराडे, प्रकाश योजना- आकाश, नेपथ्य निर्माण- प्रकाश लाड, ग्राफिक्स निर्माण- दादा कुबल, मेकअपमन- सचिन कुंभार, वेशभूषा संकल्पना- सुधीर घरीदार व गौरी गावकर, साऊंड सिस्टिम आणि मंडप- हैदर मुल्ला गडहिंग्लज.
या सर्वच कलाकारांनी जीव ओतून काम केल्यामुळे  सबूद नाट्याला पुढील काळात रंगभूमीवर नाट्यरसिक नक्कीच डोक्यावर घेतील यात शंका नाही.


No comments:

Post a Comment