कळसगादे गायरानातील अतिक्रमण प्रकरणी गुरूवारी रास्ता रोको - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2022

कळसगादे गायरानातील अतिक्रमण प्रकरणी गुरूवारी रास्ता रोको

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
           कळसगादे (ता. चंदगड) येथील गायरान गट नंबर ११ ९ मधील झालेले अतिक्रमण व बांधकाम हटवावे अन्यथा गुरुवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता चंदगड येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. कळसगादे येथील गायरान गट नंबर ११ ९ मधील झालेले अतिक्रमण व बांधकाम हटवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी चंदगड तहसील कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार करून अतिक्रमण झालेले आहे, असे निदर्शनास दाखवून दिलेले आहे. या अनुषंगाने अद्याप अतिक्रमण आपल्याकडून व ग्रामपंचायत विभागाकडून काढलेले नाही. 

          संबंधीत गट नं . ११ ९ च्या सात - बारावर ग्रामपंचायतीची परवानगी न घेता पीकपाणी तसेच पोल्ट्रीशेड नोंद करण्यात आलेली आहे. तरी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही, तोपर्यंत सर्व ग्रामस्थ रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दौलत दळवी, राजू दळवी, विजय दळवी, मनोहर दळवी, गणपती सुतार, वैभव दळवी, महेंद्र गवस, मारूती दळवी, महादेव दळवी, शंकर दळवी, पुंडलिक दळवी, सुरेश दळवी, शिवाजी सुतार, तानाजी पोपकर, प्रकाश दळवी, संजय दळवी, अनिल दळवी, कैलास गवस, शिवाजी दळवी यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment