मौजे कार्वे येथे मंदिर जीर्णोद्धार निमित्त महाप्रसादाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2022

मौजे कार्वे येथे मंदिर जीर्णोद्धार निमित्त महाप्रसादाचे आयोजनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            मौजे कार्वे (ता. चंदगड) येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा  जीर्णोद्धार कार्यक्रम 2 एप्रिल पासून  सुरू आहे. गुरुवारी या कार्यक्रमाची सांगता होणार असून त्यानिमित्त ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

          गुरुवारी सकाळी काला अभंग, गंगा पुजन, मूर्ती अभिषेक, महाआरती गाऱ्हाना व त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. तरी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अहवान ग्रामस्थ, मंदिर जीर्णोद्धार कमिटी मार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment