माडखोलकर महाविद्यालयाच्या प्रा. पाटील यांना राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2022

माडखोलकर महाविद्यालयाच्या प्रा. पाटील यांना राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक

 

प्रा. डॉ. संजय एन. पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजनेचे कोल्हापुर जिल्हा समन्वयक व चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय एन. पाटील यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 चे उत्कृष्ट कार्यक्रम  अधिकारी जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक व विद्यापीठस्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवून सन्मानीत करण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व महाराष्ट्र शासन  रा.से. योजनेचे  राज्य संपर्क अधिकारी मा. प्रशांतकुमार वनंजे यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आले.

मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्विकारताना प्रा. डॉ. संजय एन. पाटील
        राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माजी व आजी स्वयंसेवकांनी मागील तीन वर्षातील  महापूराच्या व कोरोनाच्या आपत्तीच्या कालावधीत केलेले उल्लेखनीय कार्य व राबविण्यात आलेले  विविध समाजाभिमुख उपक्रम यांची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने र. भा. माडखोलकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना एककालाही मान्यवरांच्या हस्ते प्रथम पुरस्कार देऊन गौरविले आहे.

         माडखोलकर महाविद्यालयाच्या शीरपेचामध्ये एक मानाचा तुरा रोवण्याचे कार्य प्रकल्प अधिकारी प्रा. संजय  पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या युनिटमधील स्वयंसेवकानी केले आहे. यामुळे महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामध्ये खेडूत शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, सेवक वर्गमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, सर्व स्टाफ विविध गावातील ग्रामस्थ, नगरपंचायत चंदगड, सर्व पत्रकार बंधू, विविध डाॅक्टर, दत्तक खेडी,माजी स्वयंसेवक, पोलीस मित्र, सामाजिक संघटना यांची प्रेरणा व मोलाचे सहकार्य लाभले. या सर्व योगदानामुळे महाविद्यालयाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment