दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड कंपनीने हलकर्णी (ता. चंदगड) दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावरील बंद असणारा कारखाना वर्षासाठी भाडेतत्वावर चालविणेस घेवुन मे २०१९ पासून कारखाना ताब्यात घेतलेनंतर प्रतिकूल परिस्थिती व असंख्य अडचणीवर मात करत कारखाना चालविला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दौलत कारखान्याकडील थकीत देण्यासंदर्भात या कर्मचाऱ्यांनी अथर्व व्यवस्थापनाकडे मागणी केली होती. याबाबत सकारात्मक चर्चा होवून सदरची देय रक्कम सन २०२१-२२पासून सात हप्तामध्ये देणेचे अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी मान्य केले.
खोराटे यांनी दिलेल्या शब्दांनुसार सदर पहिल्या हप्त्याची रक्कम होळी सणाच्या अगोदर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. यानिमित्य सेवानिवृत्त कामगार संघटनेच्यावतीने श्री गणेश मंदीर, कारखाना साईट येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करणेत आले आहे. सदर महापूजेच्या कार्यक्रमास अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे, दौलतचे मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील, दौलतचे अध्यक्ष अशोकराव जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील व सर्व संचालक तसेच विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर, श्रमिक संघटनेचे कॉ. अतुल दिघे उपस्थित राहणार आहेत.
यादिवशी अद्यापही पहिल्या हत्याची रक्कम जमा न झालेल्या सेवानिवृत्त कामगारांनी आपल्या राष्ट्रीय बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत आणावी व बहुसंख्येने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महापूजेला उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करणेत आले आहे.
No comments:
Post a Comment