शेवाळे येथून युवक बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

27 April 2022

शेवाळे येथून युवक बेपत्ता

परशराम तानाजी यादव


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        शेवाळे (ता. चंदगड) येथून परशराम तानाजी यादव (वय वर्षे २६ रा. शेवाळे, पोस्ट पाटणे, ता. चंदगड) हा युवक कुणालाही न सांगता रविवार दि २४ रोजी बेपत्ता झाला आहे. या बाबतची फिर्याद तानाजी यादव यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. रविवारी  रात्री एका हळदीच्या कार्यक्रमातून कुणालाही न सांगता परशराम यादव निघून गेला आहे. रंगाने सावळा, उंची पाच फुट चार इंच, अंगावर पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, निळ्या रंगाची ट्रक सुट, पायात सॅँन्डल असून तो मराठी व हिन्दी भाषा बोलतो. अशा वर्णनाचा युवक आढळल्यास चंदगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment