चंदगड / प्रतिनिधी
हलकर्णी (ता. चंदगड) येथे काल रात्री दोन महिलांचा विनयभंग झाल्याची फिर्याद पिडीत महिलांनी दिली आहे. परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीत रंजना भरमाना गावडे यांनीही १७ जणांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसातून मिळालेली माहीती अशी की सदर दोन महिला गावातील एका लग्न हळदीचा कार्यक्रम आटोपून रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घरी जात असताना आरोपी राहुल भरमाना गावडे याने दोघींचा हात धरून 'आजची रात्र ये' म्हणून लज्जा उत्पन्न असे बोलू लागला. यावेळी हात झिडकारून दोघींनी घराकडे पळ काढला. तर पीडीत दोन महिलांसह अन्य सतरा जणांनी येऊन ' सरपंच राहुल कोठे आहे. आम्ही त्याला सोडणार नाही.' आमच्या बायकांची कळ काढतो. आम्ही त्याला सोडणार नाही. असे वाईट वंगाळ बोलून शिवीगाळ करू लागले. व मुलगा विष्णू गावडे याच्या शर्टाची कॉलर पकडून धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. अधिक तपास पो नि.बी ए तळेकर यांच्या मार्गदर्शनाखली पो हे काॅ जमीर मकानदार करत आहेत.
No comments:
Post a Comment