पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी स्वागत करताना. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
सध्याच्या विज्ञानयुगात ऐहीक सुखाच्या मागे लागून मानवाने कारखानदारी मोठ्या प्रमाणात ऊभा केली. यातून प्रदूषणाचा भस्मासुर मानवी जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने मानवाने स्वतःचे आयुर्मान वाढवण्यासाठी निसर्ग वाढ करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ. संदीप पाटील यांनी केले. चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयात आयोजित मानव व वन्य संघर्ष समस्या व उपाय या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य यु डी पाटील हे होते.
सुरुवातीला प्राध्यापक के. बी. कलजी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर डॉ. संदीप पाटील आपल्या मनोगतात म्हणाले ``मानवाने स्वतःच्या जीवनाचा उच्च स्तर करण्यासाठी निसर्गातील अनेक गोष्टींचा र्हास केला .त्यापैकीच वन्य जिव संपत्ती संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरली .मोठ्या कारखानदारी आणि मानवी वस्ती साठी वन्यजीवांची तोड झाली यात पर्यावरणाचा समतोल बिघडला. हा समतोल ढासळल्याने भविष्यात मानवी जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने, मानवाने स्वतःचे आयुर्मान वाढण्यासाठी वन्यजीव संवर्धन करणे गरजेचे आहे वनांचे महत्त्व आणि मानवाची भूमिका समाजाला कळली पाहिजे तरच निसर्गातून मानवी जीवन सुखकर होण्यास मदत होईल. नाहीतर सुख असून मानवी आयुर्मान कमी होत असेल तर त्या सुखाचा उपयोग कशासाठी असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही असे मत त्यानी व्यक्त केले.``
व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयात आयोजित वन्यजीव संघर्ष समस्या आणि उपाय या वरती स्लाईड शोच्या माध्यमातून वनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला .यावेळी प्रा. गजानन पाटील ,प्रा. विलास नाईक, प्रा. युवराज पाटील यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते. प्रा. एस.डी. बागडी यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. ए. टी. आपके यांनी मानले.
No comments:
Post a Comment