'दौलत' वर लिहा आणि साखरेची बक्षिसे जिंका - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2022

'दौलत' वर लिहा आणि साखरेची बक्षिसे जिंका

दौलतचे संग्रहित छायाचत्र

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना म्हणजे चंदगडी जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा विषय, कारखान्याच्या निर्मितीपासून आज पर्यंत अनेक स्थित्यंतरे, घडामोडी, घटना, दुर्घटना, गमती- जमती घडल्या आहेत. या साखर कारखान्याचा चंदगड तालुक्याच्या राजकारण, समाजकारण व अर्थकारण यावर नेहमीच परिणाम होत आला आहे. कारखान्याचा ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व कष्टकरी जनतेला कितपत फायदा झाला? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत सध्याची पिढी सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसते. याच दौलत कारखान्याबाबत विविध प्रकारचे लेखन करून सोबत बक्षिसेही जिंकण्याची संधी गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जाहिरात

           या लेखन स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी "दौलत साखर कारखान्याने चंदगडच्या जनतेला काय दिले?" या विषयावर लेखन करायचे आहे. यातील विजेत्यांना पहिले बक्षीस २१ किलो साखर, दुसरे बक्षीस ११ किलो साखर, तिसरे बक्षीस ७ किलो साखर, उत्तेजनार्थ बक्षीस दहा स्पर्धकांना प्रत्येकी १ किलो साखर व विजेत्या सर्व १३ स्पर्धकांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.

            स्पर्धा सर्वांसाठी खुली असून लेखनासाठी शब्दमर्यादा नाही. लेखन टाईप केलेले असावे. स्पर्धकांनी आपले लेख पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, व्हाट्सअँप क्रमांक सह ॲड रवी रेडेकर, गुरुकुल चॅरिटेबल ट्रस्ट दिवाणी न्यायालय नजिक चंदगड, ता चंदगड, जि कोल्हापूर या पत्त्यावर किंवा 8888776624 / 8888776625 नंबर वर पीडीएफ फाईल करून दि. ३० जून २०२२ पर्यंत पाठवावे. असे आवाहन ॲड. रवी रेडेकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment