समृद्ध कांबळे संगीत क्षेत्रातील उगवता सितारा' - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2022

समृद्ध कांबळे संगीत क्षेत्रातील उगवता सितारा' - आमदार राजेश पाटील

उदयोन्मुख संगीतकार समृद्ध कांबळे यांचा सन्मान करताना आमदार राजेश पाटील, सोबत मान्यवर.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

            समृद्ध राजाराम कांबळे हा महाराष्ट्र व देशाच्या संगीत क्षेत्रातील उगवता सितारा आहे. असे गौरवोद्गार चंदगड चे आमदार राजेश पाटील यांनी काढले. चंदगडी नाट्यमहोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते तालुक्यातील उदयोन्मुख संगीतकार समृद्ध राजाराम कांबळे याचा सत्कार करताना बोलत होते. कला महाविद्यालय कोवाड येथील प्राध्यापक आर. डी. कांबळे (मुळगाव कोरज, सध्या राहणार नेसरी) यांचा समृद्ध हा मुलगा आहे.

जाहिरात

              प्रा. परसू गावडे  दिग्दर्शित "पॉज"  एकांकिकेला समृद्धने संगीत दिले आहे. गेली चौदा वर्ष मच्छिन्द्र बुवा यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने  तो शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. चंदगड सारख्या दुर्गम भागात राहून रंगभूमी, सिने सृष्टीत संगीत आणि गायनात नेत्रदीपक यश संपादन केले आहे. त्याने वेबसिरीज, नाटक, अल्बम, मालिकांसाठी संगीत व गायन केले असून "कैशी हे आझादी"  या हिंदी गाण्याला जपानमध्ये नामांकन मिळाले.                'हर एक तारा' नावाचा अल्बम संगीतबद्ध केला आहे. दुबई येथील संस्कृतिक महोत्सवात शास्त्रीय गायनात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावले. सद्या तो मुबंई विद्यापीठात बी. म्युझिक संगीत पदवीच्या  पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. त्याच्या या कार्याबद्दल आमदार पाटील यांनी विशेष कौतुक केले. यावेळी सरपंच शिवाजी तुपारे, संतोष वेरूळकर, बारोमांस नाटकाचे दिग्दर्शक तांडेल, बळीराजा संघटना अध्यक्ष नितीन पाटील, नाट्य कलाकार व दिगदर्शक प्रा परसू गावडे,  प्रा डॉ आर डी कांबळे, निवृत्ती हरकरे, डॉ.नंदनकुमार मोरे, , प्राचार्य एम एम तुपारे, उपसरपंच पांडुरंग बेनके, परिसरातील नाट्यरसिक  बहुसंख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment