चंदगड/प्रतिनिधी
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील एका युवकाने राहत्या घरी बेडरुममध्ये स्लॅबच्या लोखंडी हुकाला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.पराग अशोक वर्पे( वय वर्षे २८) असे मयत युवकाचे नाव आहे.
घरात कोणी नसल्याचे पाहून दारूचा नशेत बेडरूममध्ये असलेल्या स्लॅपच्या लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना साडेचार ते आठच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.याबाबतची वर्दी अशोक यशवंत वर्पे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात दिली आहे.तपास पोहेकाॅ किल्लेदार करत आहेत.
No comments:
Post a Comment