नेसरी जिल्हा परिषद मतदार संघात सर्वाधिक विकास निधीसाठी आणणार -विद्याधर गुरबे - नेसरी येथे कचरा कुंडीचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2022

नेसरी जिल्हा परिषद मतदार संघात सर्वाधिक विकास निधीसाठी आणणार -विद्याधर गुरबे - नेसरी येथे कचरा कुंडीचे वाटप

 

नेसरी येथे कचरा कुंडीचे वाटप करताना विद्याधर गुरबे , इंदुमती नाईक व मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

 नेसरी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायत येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान  सदस्य  विद्याधर गुरबे  तसेच माजी उपसभापती  सौ. इंदुमती नाईक ' यांच्या मार्फत पंचायत समिती गडहिंग्लज १५ वा वित्त आयोग मधून नेसरी जी. प.मतदार संघातील ग्रामपंचायतींतील  १०८०० कुटुंबांना कचरा कुंडी ( Dustbeen) वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत नेसरी येथे पार पडला. 

सदरच्या कार्यक्रमासाठी गडहिंग्लज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक शरद मगर, विस्तार अधिकारी श्री. खटावकर , नेसरी सरपंच  आशिषकुमार साखरे, उपसरपंच सौ. रत्नप्रभा कोलेकर, सदस्य  रणजित पाटील, रामचंद्र परीट, अमर हिडदुग्गी , खाजू ताशीलदार, तुकाराम नावलगी, सदस्या सौ. पद्मजा देसाई , गीता बुरुड , सौ. मनीषा मुरकुटे,  कार्तिक कोलेकर, ग्रामविकास अधिकारी  पी. बी. पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. याबरोबरच कचरा कुंडी वाटपाच्या वेळी नेसरी मतदार संघातील तळेवाडीचे सरपंच  सागर देसाई,  ग्रामसेवक श्री पाटील , अर्जुनवाडीचे सरपंच शामकुमार नाईक, ग्रामसेवक, सावतवाडी तर्फ नेसरीचे सरपंच  धोंडिबा नांदवडेकर व ग्रामसेवक, तसेच सरोळीचे सरपंच मारुती पाटील, हाडलगे च्या सरपंच सौ.पाटील   व ग्रामसेवक यांना कचरा कुंडी देऊन कचरा विल्हेवाट कशा प्रकारे करायचे यावर विद्याधर  गुरबे  यानी मार्गदर्शन करून नामदार.सतेज उर्फ बंटी पाटील  यांच्या मार्फत नेसरी व नेसरी जिल्हा परिषद मतदार संघात जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.सदरच्या कार्यक्रमाला सागर नांडवडेकर, विनायक नाईक, राहूल कांबळे, नागेश दळवी, गुरूनाथ चव्हाण व नेसरी परिसरातील  इतर नागरीक उपस्थित होते.





No comments:

Post a Comment