नागनवाडीच्या प्रा.डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील 'उंबळट ' व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2022

नागनवाडीच्या प्रा.डॉ. गोपाळ गावडे यांचे अस्सल चंदगडी भाषेतील 'उंबळट ' व्यक्तिचित्रण प्रकाशनाच्या उंबरठ्यावर

प्रा .डॉ . गोपाळ गावडे

तेऊरवाडी / एस .के. पाटील

'उंबळट' हे प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे ( नागनवाडी, ता. चंदगड) यांनी लिहिलेल्या व्यक्तीचित्रणांचं पुस्तक स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर यांच्याकडून लवकरच प्रकाशित होत आहे.

   चंदगडी भाषेला मराठीची बोलीभाषा म्हणून दर्जा मिळाला आहे. चंदगडीमध्ये ललित लेखन होऊ लागलेले आहे. परंतु पुस्तक रूपाने प्रकाशित होणारे 'उंबळट' हे पहिले व्यक्तीचित्रण आहे. 

         व्यक्तीतील नाठाळपणा, बेरकेपणा, प्रामाणिकपणा, जिद्द, कष्ट, स्वाभिमानासह, 'चंदगडीबोली' हे उंबळटचे वेगळेपण आहे.उंबळट हा चंदगडी बोलीतील शब्द . उंचळट म्हणजे पाऊस सतत बरसत राहिला की , जमिनीतून पाण्याचे उमाळे येतात , झरे फुटतात . शेतकरी त्याला उंबळट झाली म्हणतात . ' उंबळट ' या व्यक्तिचित्रणातील व्यक्तींच्या जीवनसंघर्षात देखील अशीच उंबळट होते . ती मानवी स्वभावाची व भावभावनांची ! आण्णूबाबाने गावात प्रवेश करताच दिलेली हक्कारी आणि स्वतः केलेली स्वतःच्याच कफनाची तयारी , कुरूप , रोग्याने देखण्या बायकोला ओढत आणणं . गावातील खेळ्याचा हक्कदार इरसाल किंवडा तुक्का , बाबुभावोचं भरकटणं आणि स्वतःला सावरण्यासाठीचा जीवतोड प्रयत्न , अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या रामाचं एकलकोंडं बनत जाणं , बिनधास्त जगणारा गण्या , भीमराव चिमणेचं बंधुप्रेम , जगणं स्थिरस्थावर करण्यासाठी धडपडणारा शिवनाथ गोसावी आणि हुशारी की आसुरी प्रवृत्ती अशा गोंधळात टाकणारा शंकर हे या उंबळटचाच एक भाग आहेत . नितांत पारदर्शक आणि चैतन्यदायी व्यक्तिमत्त्वं ' उंबळट ' या चंदगडी बोलीतील व्यक्तिचित्रणांच्या रूपात येत आहेत . जीवनसंघर्षाला सामोरं जातानाच्या उंबळटीत माशासारखी लखलखती , बहती , ओढ लावणारी , साधी , सोपी तरीही स्वभाव गुणांनी वैशिष्टयपूर्ण अशी ही व्यक्तिमत्त्वं ! त्यांच्या स्वभाव गुणांची उंबळट वाचक समजून घेतील अशी आशा लेखक प्रा .गोपाळ गावडे याना वाटते आहे . यापूर्वी चंदगड भागातील लोकगितांवर आधारीत बाई शेवंती फुललेयी या डॉ . गावडे यांच्या पुस्तकाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे . आता पुन्हा चंदगडी बोली भाषेतील दुसरे पुस्तक प्रकाशित होत आहे. याचा चंदगड कराना निश्चितच अभिमान आहे.No comments:

Post a Comment