युवकाचा पोहण्यासाठी पाण्यात मारलेला सूर अखेरचा ठरला, कुठे घडलीय ही घटना... - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2022

युवकाचा पोहण्यासाठी पाण्यात मारलेला सूर अखेरचा ठरला, कुठे घडलीय ही घटना...

मृत गुरूदेव सिंग

तेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

पाण्यात स्विमींग पूलमध्ये मारलेला सूर एका युवकाच्या जीवावर बेतला असून सूर मारल्यानंतर डोकीला जबर मार लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बेळगाव येथे घडली आहे . 

बेळगाव शहरातील हनुमान नगर भागांत ही घटना घडली आहे . 17 वर्षीय युवकाचा डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी बारा वाजता हनुमान नगर येथे घडली आहे . गुरुदेव सिंग , राहणार कमांडो क्वाटर्स कॅम्प बेळगाव असे त्या युवकाचे नाव आहे . गुरुदेव सिंग हा उन्हाळी सुट्टी सत्कारणी लावावी या हेतूने हनुमान नगर येथील जलतरण तलावात पोहोण्याच्या सरावासाठी जात होता .रोजच्याप्रमाने पोहन्यासाठी तो तलावावर गेला .  काही वेळ पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर तो सूर मारण्‍यासाठी बारा फूट उंचीवर गेला . तेथून त्‍याने पण्‍यात सूर मारला.  यावेळी त्याच्‍या डोकीला मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्‍याचा मृत्यू  झाला.  या  प्रकरचा नोंद  एपीएमसी पोलिस ठाण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment