![]() |
यर्तेनहट्टी येथे हातभट्टीची दारु नष्ट करताना पोलिस. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
यर्तेनह्ट्टी (ता. चंदगड) येथे शेतात छापा टाकून पोलीसांनी ८१००० रुपयांचे रसायन जप्त केले. चंदगड पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार यर्तेनहट्टी येथील शिवारात पोलिसांनी भीमा यल्लपा सनदी, सातप्पा अप्पाना सनदी यांच्या शेतात गावठी हातभट्टीच्या भट्टीवर छापा टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत मिळाले ८०० लिटर रसायन, भट्टीचे साहित्य असे एकूण ८१००० रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पोलिस निरिक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखली, उपनिरीक्षक सतपाल कांबळे, पो.हे.काॅ. राज किल्लेदार, खुशाल शिंदे, अमोल देवकुळे आदींनी ही कारवाई केली.
No comments:
Post a Comment