तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसंस्था
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील श्री राम विकास सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणुक गावच्या विकासाच्या मुद्यावर सर्व पक्षिय नेतेमंडळीकडून बिनविरोध करण्यात आली. ४३५ सभासद असणाऱ्या या संस्थेच्या निवडणूकीसाठी १३ जांगासाठी स्थानिक चार गटाकडून ३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये आमदार राजेश पाटील गटाचे महेश बुच्चे बिनविरोध निवडून आले होते. सुरवातीला सत्ताधारी गटाविरोधात इतर तीन गट निवडणूक रिंगणात उतरले होते. निवडणूक बिनविरोध करण्याच्या मूद्यावरून छाननिवेळी एकाही अर्जावर आक्षेप घेतला गेला नाही. पण अर्ज माघारीच्या दिवशी जागा वाटपावरून काहीसा तणाव निर्माण झाला.
सध्या गावात आमदार राजेश पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या माध्यमातून विकासकामांचा महापूर येत आहे. याच विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी आमदार राजेश पाटील गटाने दोन पावले माघार घेत आपल्याकडे ८तर विरोधी गटाना ५ जागा देत निवडणूक बिनविरोधावर शिक्कामोर्तब केले. विरोधी गटानेही त्याला होकार देऊन सहकार्याची भावना ठेवत जादा उमेदवारांचे अर्ज माघार घेतले. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अशोक पाटील, दत्तात्रय पाटील ,शिवाजी पाटील, राजेंद्र भिंगुडे, प्रा. गुरूनाथ पाटील, वाय. बी. पाटील, प्रा. एन. एस. पाटील, एम. ए. पाटील, एम. बी. पाटील, एन. व्ही. पाटील आदिनी विशेष प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment