कालकुंद्री येथे रविवारी 'सात पाटलांच्या' कुळाची यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2022

कालकुंद्री येथे रविवारी 'सात पाटलांच्या' कुळाची यात्रा

कालकुंद्रीत कुळाची यात्रा प्रसंगी गावातील सात पाटील एकत्रित जेवताना चे संग्रहित छायाचित्र.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कालकुंद्री (ता. चंदगड) येथील मूळ रहिवासी सात पाटलांच्या 'कुळाची' यात्रा उद्या रविवार दि. मे २०२२ रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होत आहे. 

         दर तीन वर्षांनी येणाऱ्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा लाभली आहे. गावातील एकोपा अबाधित ठेवून मतभेदांना तिलांजली देण्यासाठी पूर्वजांनी ही यात्रा सुरू केली होती, ती आजतागायत सुरू आहे. गावातील सात पाटलांच्या सात घराण्यातील प्रत्येकी दोन व्यक्ती असे १४ जण यात्रा प्रसंगी एकाच ताटात जेवतात. यामुळे आपसातील मतभेद मिटून सामंजस्य वाढीस लागते अशी श्रद्धा आहे. असे या यात्रेचे वैशिष्ट्य असून अशा प्रकारची प्रथा महाराष्ट्रात बहुदा एकमेव असेल असे जाणकार सांगतात. कुळ देवासमोर पहिले दुपारी एकत्रित जेवणाचा मान झाल्यानंतर उपस्थितांना मांसाहारी जेवणाचा प्रसाद वाटप केला जातो.

No comments:

Post a Comment