नामदेव जोतिबा सरनोबत तुकाराम महादेव कांबळे
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
केरवडे (ता. चंदगड) येथील
श्री पंडविर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी नामदेव जोतिबा सरनोबत तर उपाध्यक्षपदी तुकाराम महादेव कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निबंधक अनुराधा काटकर यांनी काम पाहीले. अध्यक्षपदासाठी नामदेव सरनोबत याचे नाव मारुती जानु कुद्रे यांनी नाव सुचविले तर उपाध्यक्षपदासाठी तुकाराम कांबळे यांचे नाव दीपक पांडूरंग गावडे यानी सुचवले. त्याला अनुक्रमे शंकर गोपाळ चांदेकर व अनंत रामचंद्र निचम यांनी अनुमोदन दिले. यावेळी संचालक मारूती ढोणुक्षे, मारूती कुट्रे, शंकर चांदेकर, दिपक गावडे, उत्तम पाटील, अनंत निचम, नामदेव गावडे, शिवाजी शिरगावकर, लक्ष्मी नाईक, वनिता वाईगडे यासह नागोजी गावडे, मनोहर कुद्रे, विठ्ठल सरनोबत, जोतिबा ढोणुक्षे, बाबू सरनोबत, महादेव नार्वेकर, तुकाराम कुट्रे, अर्जुन तुपट आदी सभासद उपस्थित होते. ग्रा. प. सदस्य शंकर नार्वेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment