चंदगड नगरपंचायत - कचरा डंपर मधून गेलेली बोरमाळ शोधून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2022

चंदगड नगरपंचायत - कचरा डंपर मधून गेलेली बोरमाळ शोधून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बोरमाळ शोधून काढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना नगरसेविका प्रमिला गावडे व नागरिक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

              चंदगड शहरातील कचरा गोळा करणाऱ्या डंपर मधून वार्ड नंबर १६ मधील एका महिलेची सोन्याची बोरमाळ नजरचुकीने घरातील कचऱ्या सोबत टाकण्यात आली. हे नंतर लक्षात आल्यामुळे त्या महिलेच्या तोंडचे पाणी पळाले. तिने तात्काळ डंपर कडे धाव घेऊन डंपरसोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. नगरपंचायतीच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी अशक्यप्राय वाटणारे शोधकार्य एक आव्हान म्हणून स्वीकारत अक्षरशः कचऱ्याच्या डोंगरातून बोरमाळ शोधून काढली. त्या महिलेच्या हाती बोरमाळ सुपूर्द करताच तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ही गोष्ट नगरसेविका प्रमिला परशराम गावडे यांना समजताच संबंधित कर्मचारी मारुती वायदंडे, मधू रुद्रा घोळ व गाडी चालक नदीम मुल्ला यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करत कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांतूनही कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन होत होते.

No comments:

Post a Comment