शिरगाव येथील वैभव सेवासंस्थेच्या अध्यक्षपदी मुळीक, उपाध्यक्षपदी श्रीमती गावडे बिनविरोध - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2022

शिरगाव येथील वैभव सेवासंस्थेच्या अध्यक्षपदी मुळीक, उपाध्यक्षपदी श्रीमती गावडे बिनविरोध


अंकूश नारायण मुळीक

श्रीमती रंजना गोपाळ गावडे


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील वैभव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अंकूश नारायण मुळीक व उपाध्यक्षपदी श्रीमती रंजना गोपाळ गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी महादेव पाटील होते.

         यावेळी संचालक, तुकाराम फाटक, विष्णू मुळीक, दामोदर सामंत, कृष्णा सुर्यवंशी, राजू कांबळे, दिलीप सुंडकर, पुंडलिक भोगण, सौ. सुनीता मुळीक, माजी अध्यक्ष कृष्णा मुळीक, संस्थेचे मार्गदर्शक अनिल गोपाळ गावडे, सचिव गावडू गावडे, पुंडलिक मुळीक उपस्थित होते.No comments:

Post a Comment