शिक्षक बँकेकडून मयत सभासदांना धनादेश वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2022

शिक्षक बँकेकडून मयत सभासदांना धनादेश वाटप

हलकर्णी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शिक्षक बँक शाखेत मयत सभासद वारसांना मदतीचे  धनादेश वाटप करताना संचालक शिवाजी पाटील, माजी अध्यक्ष हुद्दार,सदानंद पाटील व शिक्षक वर्ग.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          प्राथमिक शिक्षक बँक शिक्षकांचे हलकर्णी (ता. चंदगड) येथील शाखेचे सभासद असलेले जोतिबा रामू कडगावकर (मांडेदुर्ग) व लक्ष्मण परशराम नाईक (दाटे) यांच्या वारसाना मयत सभासद कल्याण निधीतून २५ लाखापर्यंत चे संपूर्ण कर्ज माफ करून कुटुंबाला एक लाखाची तसेच डीसीपीएस धारकांना पाच लाख तात्काळ भरीव आर्थिक मदतीचे धनादेश हलकर्णी ता.चंदगड येथील बँकेच्या शाखा कार्यालयात संचालक शिवाजी शंकर पाटील व माजी अध्यक्ष रमेश हुद्दार यांच्या हस्ते  देण्यात आले.

            सभासद हिताच्या अनेक योजना यशस्वीपणे राबवणारी बँक असा  बँकेचा लौकिक आहे. यंदा. यावेळी दस्तगीर उस्ताद शाहू पाटील, परशराम नाईक, टी. जे. पाटील, सदानंद पाटील, अशोक नौकुडकर, रवी साबळे, भरमू तारीहाळकर, डी. बी. पाटील, विनोद कोरवी, गणपत पाटील राजाभाऊ नंद्याळकर अनंत मोटर, अविनाश दावणे, गुंडू नाईक, श्री. गडदाकी, प्रकाश पाटील, सटूपा फडके शाखाधिकारी वाय. एस. पाटील, एम. टी. पाटील, विलास बेनके, नीलम रेडेकर, प्रदीप पालेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन सट्टूप्पा फडके यांनी केले. आभार अशोक नौकुडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment