![]() |
हलकर्णी महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करताना. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आजच्या तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराज हे युवकांचे आदर्श आहेत. त्यांच्या सारखा स्वाभिमानी राजा सापडणे दुर्मीळ. आपल्या पावणे नऊ वर्षाच्या कारकिर्दीत अनेक लढाया जिंकणारे व एकाही लढाईत पराभव न पत्करणारे ते एक शौर्यवान राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद सोडता छत्रपती संभाजी महाराजांच्या इतका पराकमी - स्वातंत्र्यप्रेमी व सुसंस्कृत राजा दुसरा झाला नाही. या तेजस्वी राजाचा वस्तुपाठ जपला पाहिजे त्यांनी वयाच्या ३२ व्या वर्षी देशासाठी हौतात्म्य स्वीकारले ते आपले प्रेरणास्थान आहेत. आज समाजाला आपल्या कामगिरीने व हौतात्म्याने अमर झालेल्या स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे हौतात्म्य ही भारताच्या इतिहासातील अत्यंत तेजस्वी व कांतीकारी घटना होय. त्यांच्या जयंतीचा दिवस तरुणाईमध्ये ऊर्जा निर्माण करणारा दिवस असल्याचे प्रतिपादन प्राचार्य पी. ए. पाटील यांनी केले.
ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी प्रा . मधुकर जाधव यांनी प्रास्ताविक केले. छ.संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन प्रा. एन. एम. खरूजकर, प्रा. यु. एस. पाटील, प्रा. एम. एम. तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ . आय . आर जरळी , प्रा . व्ही . व्ही . कोलकार , प्रा . के एम . गोनुगडे, प्रा.जी.जे. गावडे प्रा . जी . पी . कांबळे, प्रा . एन . एम . हाजगोळकर, प्रा . सुवर्णा पाटील, कार्यालयीन अधिक्षक प्रशांत शेंडे , श्री.बी.बी. नाईक , श्रीपती कांबळे , नंदूकुमार बोकडे , मंदिप पाटील , अल्ताफ मकानदार , आदिसह . शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी , विद्यार्थीनी उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन डॉ . एम . व्ही . जाधव यांनी केले.
No comments:
Post a Comment