शिनोळी येथे सोमवारी १६ रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2022

शिनोळी येथे सोमवारी १६ रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
        शिनोळी बुद्रुक व शिनोळी खुर्द मार्फत जंगी कुस्त्यांचे विराट  मैदान सोमवार दि. १६ मे रोजी दुपारी ३ वाजता वसंत विद्यालयासमोर आयोजित केले आहे. कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 
      प्रथम क्रमांकासाठी पै. संगमेश बिराजदार कर्नाटक केसरी व पै. मारुती सूर्यवंशी भोसले व्यायाम मंडळ सांगली, दुसऱ्या क्रमांकासाठी पै. विक्रम शिनोळी महाराष्ट्र चॅम्पियन त . शाहू कुस्ती केंद्र व पै. सचिन निकम इचलकरंजी, तिसऱ्या क्रमांकासाठी पै. किर्तीकुमार बेनके कार्वे व पै. एकनाथ बेंद्रे, चौथ्या क्रमांकासाठी पै. रोहित पाटील व पै. भैया शिंदे, पाचव्या क्रमांकासाठी पै . प्रसाद अष्ठमी व पै. प्रदीप शिंदे यांच्यासह आदी लहानमोठ्या ३४ कुस्त्या होणार आहेत. याचा कुस्ती शौकीनांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिनोळी बुद्रुकचे सरपंच नितीन पाटील आणि शिनोळी खुर्दचे सरपंच परशराम पाटील यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment