चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
बुक्कीहाळ खुर्द व बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवीचा ओटी भरणे व कळशी मिरवणूक कार्यक्रम मंगळवार दि. ३१ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी धार्मिक कार्यक्रम व देवीची आरती होणार असून ११ते १२ वाजता सुहासिनी व कुमारिका यांची डोकीवरून कळशी मिरवणूक होणार आहे. त्यानंतर दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. दुपारी दोन वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment